मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग   

मुंबई : दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला रविवारी पहाटे आग लागली. दुर्घटनेत प्राणहानी झालेली नाही. १२ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले, अशी माहित अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.
 
बल्लार्ड इस्टेट परिसरातील कैसर इ हिंद इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. इमारत पाच मजली असून चौथ्या मजल्यावर ईडीचे कार्यालय आहे. काही तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात फर्निचर, कपबोर्ड, विद्युत उपकरणे भस्मसात झाली. मुंबई अग्निशमन दलाने आग मोठी होती, असे सांगितले असून पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी ती आटोक्यात आणली. आठ अग्निशमन गाड्या आणि सहा जेट्टी, पाण्याचे बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. कार्यालयातील कागदपत्रे आणि उपकरणांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तविला आहे. 

Related Articles